Type to search

नंदुरबार

मोरवड येथे आज गुजर समाजाची सभा

Share

मोदलपाडा, ता.तळोदा । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील मोरवड येथे दि.10 नोव्हेंबर रोजी समस्त दोडे गुजर समाज मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज अध्यक्ष यशवंत  पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. मोरवड येथील रघुवीर चौधरी यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजता सभेला सुरुवात होणार आहे. नवनियुक्त पदाधिकारी शासकीय सेवेत निवृत्त व पदोन्नती मिळालेले समाजातील व्यक्तींचा सत्कार करणे, गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना बक्षीस वितरण व त्यांचा सन्मान व सत्कार करणे, समाजातील चालीरीती रूढी परंपरा यावर चर्चा करणे, सामुदायिक विवाह नियोजन करण्यासाठी चर्चा करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

बैठकीत शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये दहावी व बारावी, पदवीधर, डिप्लोमा, पदव्यूत्तर पदवी, स्कॉलरशिप व इतर विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी समक्ष हजर राहून सन्मान स्विकारावा व समाज बांधव-भगिनींनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज अध्यक्ष यशवंत पटेल, उपाध्यक्ष प्रा.मिनल पाटील, संचालक रघुवीर चौधरी, कन्हैयालाल पटेल, हिम्मत पटेल, शेलू चौधरी, भावेश पाटील, मीना पाटील, अ‍ॅॅड.स्वाती पाटील, रणधीर पटेल यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!