मोबाईल वापरल्याचा जाब विचारला म्हणून सहकारी जवानाकडूनच मेजरची गोळ्या झाडून हत्या

0

उरीमधे राष्ट्रीय रायफल्सच्या आठव्या बटालिअनच्या मेजर शेखर थापा यांची हत्या करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरुन सहकारी जवानानेच मेजर शेखर थापा यांची हत्या केली.

कर्तव्यावर असताना मोबाईल वापरला म्हणून जवानाला मेजर थापा यांनी जाब विचारला होता. शिवाय कारवाईचाही इशारा दिला होता. यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्या दरम्यान मोबाईलचं थोडं नुकसान झालं. त्याचा राग डोक्यात ठेवून जवानाने मेजर शेखर थापा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि उपचारादरम्यान मेजर थापा यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*