मोबाईल तपास लावताना सापडला दुचाकीचोर

0

शेवगाव पोलिसांची कामगिरी 

 

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास लावतांना दुचाकीचोर पोलिसांच्या हाती लागल्या. या चोरट्यांकडून पोलिसांनी पाच दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले असून इतरांच्या शोधात पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

 

 
शेवगाव पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरुन मोबाईल चोरीमध्ये संशयितरित्या आरोपी प्रमोद उर्फ नारायण काकासाहेब पठाडे (वय 20 वर्षे, रा. साष्टी पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) यास सापळा रचुन पकडले. चौकशीत त्याच्याकडे चोरीचा मोबाइल फोन मिळुन आला. सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारासह पाच दुचाकीवाहने चोरल्याची कबुली दिली. ही चोरलेली दुचाकी वाहने तपास कालावधित काढुन दिली.

 

 
1 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनाचा मोबाईल, 80 हजार रुपये किंमतीच्या दोन होंडा युनिकॉर्न (क्रमांक एमएच 17, एएस 7247 व एमएच 20, एएल 5326), 20 हजार रुपये किंमतीचा बजाज प्लॅटिना क्रमांक (एमएच 20, बीएक्स 0529), 15 हजार रुपये किंमतीची बजाज डिसकव्हर (क्रमांक एमएच 16, एडी 4611), 40 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस अपाची (क्रमांक नाही) अशी 1 लाख 56 हजार रुपये किंमतीची दुचाकी वाहने व मोबाइल पोलिसांनी आरोपीकडुन हस्तगत केला आहे.

 

 
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर, सहाय्यक फौजदार बाबासाहेब बोरुडे, हे. कॉ. अकोलकर, पो. कॉ. सुधीर खाडे, दीपक पवार, धनंजय गुडवाल यांच्या पथकाने केली.

 

 

 या आरोपीकडून पोलीस तपासात आणखी वाहने मिळून येण्याची शक्यता आहे. नगर, बीड, औरंगाबाद या लगतच्या जिल्ह्यात हा आरोपी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास केला जात आहे. आरोपीकडून ताब्यात घेतलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा असून संबंधित वाहन मालकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*