मोबाईल चोरट्यांमुळे रेल्वे प्रवाशाचा बळी

0

जळगाव |  प्रतिनिधी : हॉटेल मॅनेजमेंटचा पेपर देण्यासाठी जात असलेला विद्यार्थी रेल्वेच्या डब्यात दरवाज्याजवळ मोबाईल खेळत होता. याचवेळी जळगाव रेल्वे स्थानकानजीक सक्रीय झालेल्या मोबाईल चोरट्यांनी काठीच्या साह्याने मोबाईल पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्याथी तोल जावून खाली खेचला गेला. यामुळे रेल्वेखाली येवून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नरेशचंद्र प्रकाश जैस्वाल (वय २२) या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणगेट येथील रहिवासी नरेश जैस्वाल हा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षाला असलेल्या जैस्वाल यांची परीक्षा सोमवारपासून सुरु होणार होती.

त्यासाठी अपूर्व जानबासोबत जैस्वाल हा ग्वाल्हेर येथे रेल्वेने जात होता. औरंगाबाद येथून रेल्वे जात असतांना जळगाव रेल्वे स्थानकानजीक नरेश याला एकाचा फोन आला. दरवाज्याजवळ उभा राहून मोबाईलवर बोलत असतांना रेल्वे स्थानकावर सक्रीय झालेल्या मोबाईल चोरट्यांनी काठीच्या साह्याने मोबाईल पाडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जैस्वाल हा खाली खेचला गेला. यामुळे रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नरेश याला जिल्हा रुग्णालयात हलवले असता, त्याचा वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. दरम्यान या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*