मोटारसायकल खरेदी करण्यासाठी नाशिकमध्ये गर्दी

0

नाशिक : सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट देऊ केली आहे. सुटचा लाभ  घेण्यसाठी हजारो ग्राहकांनी होंडाच्या शोरूमला गराडा घातला आहे.

होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली असून मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांची सुट दिली आहे.

आज दुपारी 4 पर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  तसेच अचानक वार्ता मिळाल्यानंतर अनेकांची पैशांची जमवाजमव झाली नाही त्यामुळे अनेकांचे डिस्काउंटमध्ये गाडी घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

या मोटारसायकल्स खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंत त्यांची  नोंदणी होणे आवश्यक आहे कारण एप्रिल च्या एक तारखेपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

तसेच नाशिकमधील काही होंडाच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी बघून डिस्काउंट कमी करण्यात आल्यामुळे ग्राहक नाराज दिसून आले होते. तसेच अनेकांनी फोनवरून नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, फक्त लिओ आणि होंडाची नवी हीच गाडी शिल्लक असून त्यांच्यावरच डिस्काउंट दिला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व गाड्या कॅश घ्याव्या लागणार आहेत. तसेच ग्रामीण भाग आणि शहरात या गाड्यांची किंमत सारखीच आहे. असल्याची माहिती वृषभ होंडा चे व्यवस्थापक राजेश दाणी यांनी देशदूतला दिली.

LEAVE A REPLY

*