Type to search

नंदुरबार

मोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी

Share

आमलाड ता. तळोदा| वार्ताहर  – तळोदा तालुक्यातील धवळीविहिर गावाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील धवळीविहिर गावाच्या पुढे रस्त्यावर आज दि.२२ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास करमसिंग दोहडया वळवी (रा.माळखुर्दे ता. तळोदा) हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल (क्र.एम.एच.४१-एन.५९०७) भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालवत असतांना समोरून येणारी मोटरसायकल (क्र.एम.एच.१९- ए.डब्ल्यु. ६९१५) हीस जोरदार धडक दिली. या अपघातात करमसिंग दोहडया वळवी (रा.माळखुर्दे ता.तळोदा) यांचा मृत्यू झाला.

तर संजय दिलवर वळवी, किसन देवर्‍या वळवी, मिलन बबन वळवी हे जखमी झाले. यातील मिलन बबन वळवी व किसन देवल्या वळवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मिलन बबन वळवी (२०) रा.बेडापाडा ता.तळोदा या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजय दिलवर वळवी रा.बेडापाडा ता.तळोदा यांनी दिलेल्याफिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात मयत करमसिंग दोहडया वळवी याच्याविरूध्द भादंवि कलम ३०४, ३७९, ३३७, ३३८, ४२७ मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहनलाल वळवी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!