मोकाट गुरे व डुकरांमुळे पिकांचे नुकसान

0
मोदलपाडा । वार्ताहर – तळोदा शहरालगत असणार्‍या शेतीची मोकाट गुरे व वराहांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.शहाराला लागून शेती असणार्‍या शेतकर्‍यांच्या पिकांचे त्यामुळे नुकसान होत असून शेतीची मोकाट गुरे व वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा, याबाबत शेतकर्‍यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा रस्त्याला लागून शेतकर्‍यांची शेतजमीन आहे. या शेतजमीनीवर कापूस, ऊस, फळझाडे, आदी पिकांची लागवड केलेली आहे.

जनावरे व अन्य घटकांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेताला काटेरी कुंपण घालण्यात आले आहे.तरी कुंपनाची नासधूस करून डुकरे व गुरेढोर शेतात घुसतात. त्यामुळे कुंपनासह पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतपिकांच्या नुकसानीचा विचार करून डुकरे व मोकाट गुरे-ढोरांच्या त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच तात्काळ कार्यवाही न झाल्यास शेतपिकांच्या नुकसानिस नगरपालिकेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी सुभाष टवाळे, हेमचंद्र टवाळे, प्रभाकर सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, गुलाब सूर्यवंशी, अनिल माळी, राजेंद्र माळी, सतीश मगरे, महेंद्र सूर्यवंशी, सुजित टवाळे, अनिल सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, आदी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*