Type to search

धुळे

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर स्थायीत गांभीर्य नाही

Share

धुळे । महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक अमीन पटेल यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला. परंतु सभापतींनीही त्यांची खिल्ली उडविली. यामुळे पटेल हे संतप्त झाले. परंतु उपायुक्तांनी उद्यापासून यावर उपाययोजना केली जाईल असा पडदा टाकल्यामुळे सभागृहात पुन्हा कामकाज सुरु झाले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सिटी सर्व्हे नंबर 3049, 3050 आणि 2927 कै. लाल बहादूर शास्त्री भाजीपाला मार्केट, पाचकंदील येथे खाजगी करणातून व्यापारी संकुल बांधकाम कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बैठक घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करण्यात आलेल्या कार्यालयीन टिपणी यावेळी मांडण्यात आली.

सभेत नगरसेवक अमीन पटेल यांनी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांना कुत्रे चावे घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. यावर सभापतींनी त्यांची खिल्ली उडविली. यामुळे अमीन पटेल हे संतप्त झाले. परंतु उपायुक्त शांताराम गोसावी यांनी यावर उपाययोजन करण्यात येतील असे सांगितले त्यामुळे पडदा पडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!