Type to search

जळगाव

मोंढाळे येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू

Share

पारोळा । तालुक्यातील मोंढाळे प्र उ येथील एका 45 वर्षीय इसम नदीपात्रात पडून बुडून मरण पावल्याची घटना दिनांक 16 रोजी सकाळी सात वाजेपूर्वी उघडकीस आली.

याबाबत भटू दुला ठाकरे वय 45 राहणार मोंढाळे प्र उ हा दिनांक 14 रोजी सकाळी दहा वाजेपासून घरून गेला असता घरी न आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी नदीपात्रातील बहादरपुर पर्यंत दोन्ही काठांवर,सर्वत्र शोध घेतला असता तरी तो मिळून आला नाही. दिनांक 16 रोजी सकाळी सात वाजता मोंढाळे प्र.उ गावाबाहेरील पिंपरी गावाजवळील नदीपात्रात झाडाझुडपात पाण्यात बुडून मरण पावलेला अवस्थेत तो नातेवाईक व ग्रामस्थांना दिसून आला. त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता तो मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत पारोळा पोस्टेला राहुल भटू ठाकरे वय 26 राहणार मोंढाळे प्र उ यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल आशिष चौधरी हे करीत आहेत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!