Type to search

मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीम

आरोग्यदूत

मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीम

Share

त्वचेचा उजळपणा, गोरेपणा, फेअरनेसपणा रंगछटेचा सारखेपणा, नाजूकपणा तेज, ताजेतवानेपणा, स्थिती स्थापकत्वता व टाईटपणा वाढवणे यासाठी लेसर उपचार उपयुक्त ठरतात.

लेसर स्किन रिसर्फेसिंगमुळे त्वचेवरील खड्डे, पिंपल्सचे व्रण, खडबडीतपणा, जखमांचे व्रण, सुरुकुत्या यांचेवर फायदा होतो व त्वचा अधिक गुळगुळीत, तरुण व उजळ होते. यासाठी उपलब्ध असणार्‍या तंत्रज्ञानामध्ये अल्ट्रापल्स सी. ओटू लेसरने उपचार हे सुपरपल्स सी. ओटू लेसरने केलेल्या उपचारांपेक्षा अधिक प्रमाणात फायदा देतात.

त्वचेची निगा राखण्यामध्ये त्वचेचे संरक्षण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्वचेचे थंड हवेतील/ एअर कंडिशनिंगच्या हवेतील कोरडेपणा, वातावरणातील अतिउष्णता/ थंडी, सूर्यप्रकाश, तीव्र कृत्रिम प्रकाश, रासायनिक प्रदूषण कररारे हवेतील कण, अनावश्यक सौंदर्य प्रसाधने, आरोग्य सौंदर्य प्रसाधने, यापासून संरक्षण करावे.

त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहील याचे भान ठेवावे. त्वचेच्या पृष्ठभागातील ओलसरपणामुळे त्वचेचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होते. त्यासाठी रोज भरपूर पाणी प्यावे. (कमीत कमी 2 लिटरपर्यंत) त्वचेवर मॉईश्चरायझरचा वापर करावा. ओलिव्ह, सनफ्लॉवर, जवसचे तेल, लोणी, खोबरेल तेल हे नैसर्गिक व स्वस्त मॉईश्चरायझर आहेत. तेलकट त्वचेवर व पिंपल्स येणार्‍या त्वचेवर मॉईश्चरायझरची गरज नसते. आपण जर बाजारातील अल्कलाईन स्वरुपाचा साबण वापरत असाल तर आपणास मॉईश्चरायझरची गरज पडते.

नॉर्मल त्वचेवर उन्हाळ्यात लोशनच्या स्वरुपातील मॉईश्चरायझर व सनस्क्रिन वापरावे व हिवाळ्यात क्रिमच्या स्वरुपातील मॉईश्चरायझर व सनस्क्रिन वापरावे.

थंड हवेत तेलकट त्वचेवर लोशनच्या स्वरुपातील मॉईश्चरायझर व सनस्क्रिन वापरावे. पण जर तेलकट त्वचा हिवाळ्यात कोरडी दिसत असेल तर काही काळासाठी क्रिमच्या स्वरुपातील मॉईश्चरायझर व सनस्क्रिन वापरावे.

वयाच्या 30 व्या वर्षानंतर व्यक्तीची त्वचा कोरड्या स्वरुपाची बनण्याची शक्यता वाटते. अशा त्वचेवर क्रिमच्या स्वरुपातील मॉईश्चरायझर व सनस्क्रिन वापरावे.

सनस्क्रिन त्वचेवर लावल्यावर त्याचा फायदा 1/2 तासाने मिळतो. कोणतेही सनस्क्रिन शंभर टक्के संरक्षण देत नाही. म्हणून सनस्क्रिन लावले असले तरी चेहर्‍यावर स्कार्फ/डोक्यावर रुंद कडेची कॅप वापरावी.

सनस्क्रिन लावल्यावर त्याचा फायदा फक्त दोन तासापर्यंत टिकतो. कॉम्प्युटरसमोर काम करणार्‍या व्यक्तीने दर 2 तासाने सनस्क्रिन वापरावे.

बाजारातील बहुसंख्य साबण अल्कधर्मिय असतात व ते त्वचेवरील तेलकट संरक्षक थर नाहीसे करतात. म्हणून आम्लधर्मिय वा न्यूट्रल स्वरुपाचे साबण, फेस वॉश, फेस क्लिनझर वापरावेत.

डॉ. प्रमोद महाजन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!