मैल कामगारांची निदर्शने

0

धुळे /जिल्हा परिषदेतील रस्त्यावर काम करणार्‍या मैल कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे आज भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या धुळे जिल्हा मजदूर संघातर्फे निदर्शने करण्यात आली.

या कामगारांना गेल्या सहा महिन्यापासून नियमीत वेतन मिळत नाही. तर दोन महिन्यापासून वेतनच मिळालेले नाही.

यामुळे या कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. यासंदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.

त्यानंतर सदर खात्याकडून या संदर्भात चौकशी सुरु आहे, परंतु तरीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज कामगारांनी निदर्शने केली.

 

LEAVE A REPLY

*