मेहुणबारे पोलीस ठाण्यात महिला आराम कक्षाचे उद्घाटन

0

चाळीसगाव | प्रतिनिधी :  तालुक्यातील मेहणुबारे येथील पोलीस ठाण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या महिला आराम कक्षाचे उद्घाटन मगंळवारी जलसंपदांमत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.

यावेळी ना.गिरीश माहाजन यांच्यासोबत आमदार उन्मेष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस आधिक्षक नंदकुमार ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ आदि उपस्थित होते.

यावेळी ना. गिरीश महाजन यांनी पोलिस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. तसेच मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत पाच गावे तंटामुक्त केल्याचेही मंत्री महाजन यांनी समाधान व्यक्त केले. वरखेडे लोंढे बॅरेजला आता शंभर कोटी दिले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेला जाणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. आमदार उन्मेष पाटील यानी मागोत व्यक्त करतांना सांगितले की, येवला, नांदगाव, पिलखोड, बहाळ, एरंडोल या राज्य मार्गासाठी १०७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यामुळे लवकरच या राज्य महामार्ग क्रमांक २५ चे काम सुरु केले जाणार आहे. तसेच गिरणा नदीवरील सात बलुन बंधार्यांच्या कामाची फाईल अंतिम टप्प्यात असून लवकरच हे सात बंधारे पुर्ण करण्यात येतील असेही आमदार उन्मेष पाटील म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनीही मनोगत व्यक्त करत मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या कामगिरी विषयी समाधान व्यक्त केले. यावेळी खुनाच्या आरोपीला पकडुन दिल्याबद्दल सायगाव येथील पोलिस पाटील आबा शिंदे यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दिनेश बोरसे, पियुष साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या मोहीणी गायकवाड, भाजपाचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब वाघ, मेहुणबारे ग्रा.पं. सर्व सदस्य, डॉ.वैध्दवी पंडीत, डॉ.संतोष सांगळे, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष संजय राजपूत, ग्रामविकास अधिकारी अनिल पगारे, बाळासाहेब पाटील, तंटामुक्तीचे जिल्हा मार्गदर्शक बी.के महाजन व पोलिस पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचेे प्रस्ताविक सपोनि. दिलीप शिरसाठ यांनी केले. तर सूत्रसंचालन एम.एस.पारेराव व क्रीडा शिक्षक सुनिल साळुंखे यांनी केले.

LEAVE A REPLY

*