Type to search

क्रीडा

मेरी कॉमला सुवर्ण

Share

गुवाहाटी । सहा वेळाची विश्व विजेता मेरी कॉमने आज (शुक्रवार) करमबीर नबीन चंद्र बारदोलोई एसी इंडोर स्टेडियममध्ये खेळलेल्या इंडिया ओपन अंतरराष्ट्रीय बाक्सिंग स्पर्धेचे 52 किलो भारवर्गात सुवर्ण पदक जिंकले.

मेरीच्या व्यतिरिक्त सरिता देवी आखेरकार तीन वर्षापासून सुरू असलेला आपला सुवर्ण पदकाचा दुष्काळ समाप्त करण्यात यशस्वी राहिली. सरिताने 60 किलो भारवर्गात सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी तिने शिलाँगमध्ये 2016 ला दक्षिण अशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकले होते. 57 किलो भारवर्गाच्या सामन्यात नीरजने मनीषा मौनला मात देऊन सुवर्ण पदक प्राप्त केले.मेरी कॉमने फायनलमध्ये वेनिला दुआतीला 5-0 ने मात दिली. हे मेरीचे इंडिया ओपनचे दुसरे सुवर्ण आहे. यापूर्वी ती 48 किलो भारवर्गात सुवर्ण जिंकलेली आहे. तसेच पुरूषांमध्ये अमित पंघल (52 किलो भारवर्ग) आणि शिवा थापा (60 किलो भारवर्ग) ने स्पर्धेचा शेवट सुर्व जिंकून केला. पंघलने फायनलमध्ये आपल्या देशाच्या सचिन सिवाचला मात दिली. सचिनचा बांधा अमितपेक्षा जास्त होचा तरी देखील याचा अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी राहिला.

पहिल्या राउंडमध्ये त्याने डिफेंसिव खेळले, परंतु दुसर्‍या राउंडचा शेवट होईपर्यंत तो आक्रमक झाला होता. येथून अमितने मागे वळून पाहिले नाही आणि सचिनला मात दिली.

शिवाने आपल्या घरात चांगले प्रदर्शन करून भारताच्या मनीष कौशीकला मात दिली. यासह शिवाने 2018 मध्ये मनीषद्वारे मिळालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. गुवाहाटीच्या शिवाने हा सामना 5-0 ने जिंकला.

सरिता देवीने फायनलमध्ये सिमरनजीत कौरला 3-2 ने मात देऊन सुवर्ण प्राप्त केले. हे सरिताचे तीन वर्षात पहिले सुवर्ण आहे. तिने हे पदक आपल्या आईला समर्पित केले ज्याने कॅन्सरमुळे आपला जिव गमावला होता.

विश्व चॅम्पियनशिपची रौप्य पदक विजेता सोनियाला मात दिल्यानंतर नीरजने आपला दबदबा फायनलमध्ये कायम ठेवला आणि मनीषाला 5-0 ने मात दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!