मेटॅबोलिक सिंड्रोम

0

मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार – ज्या रुग्णांना दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आहे अशापैकी 65 ते 90% रुग्णांना उच्च रक्तदाबाचा विकार जडतो. या दोन्ही आजारांचा परस्परांशी संबंध ‘सायक्लिक’ अशा शब्दांनी वर्णन करतात. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडावर अनिष्ट परिणाम होतो, शिवाय मूत्रपिंड विकार वेगाने बळावत जातो.

मूत्रपिंडे निकामी होण्यामागे उच्च रक्तदाबाचा आजार हे फार मोठे कारण आढळून येते. आणखी एक गोष्ट म्हणजे बळावत जाणारा मूत्रपिंड विकार अनियंत्रित रक्तदाबावर अनिष्ट परिणाम घडवून आणतो. कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढलेले असते आणि रक्तवाहिन्यातील प्रवाहाला देखील मोठ्या प्रमाणात विरोध निर्माण होतो.

या सर्व घटनांमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मूत्रपिंडातील बिघाड होण्याचा वेग काही प्रमाणात तरी आटोक्यात आणता येतो. या सर्व परिस्थितीत अशा रुग्णातील रक्तदाब सुनियंत्रित करण्यासाठी अनेक गटातील औषधांचा वापर करावा लागतो. अगदी तीन ते चार प्रकारातील औषधे वापरली जातात.

चयापचय यंत्रणेतील बिघाड
मेटॅबोलिक सिंड्रोम नावाने ओळखला जाणारा आजार हा अनेक आजारांचा समूहच आहे. उदा. आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रियेतील बिघाड, वाढलेला रक्तदाब, कंबरेचा वाढलेला घेर, रक्तातील ट्रायग्लिसराईडस् या चरबीची वाढलेली पातळी, हायडेन्सिटी लायपोप्रोटीनचे घसरलेले प्रमाण, चांगले कोलेस्टेरॉल कमी असणे आणि रक्तातील इन्सुलिनची वाढलेली पातळी असे सर्व प्रकारचे आजार या गटात अंतर्भूत केले जातात.

चाळिशीतील वाढलेला रक्तदाब आणि घ्यावयाची विशेष काळजी-
1) आपली शारीरिक चाचणी नियमितपणे करा.
2) धुम्रपान करीत असाल तर
* हळूहळू ते कमी करा आणि लवकरात लवकर बंद करा.
* तंबाखूचे सेवन करू नका.
3) दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करा किंवा फिरा, चाला.
4) मद्यपान मुळीच करू नका.
* मद्यपानाची सवय लावून घेऊ नका.
* मद्यपान विरोधी मित्रमंडळीत सामील व्हा. नवा छंद लावून घ्या. यामुळे मद्यपान थांबू शकेल.
5) आहारविषयक काळजी-
* फलाहार जास्त प्रमाणात करा. ताज्या भाज्या खा. आहारात मासे आणि लिमीट असावे.
* आहारात मीठ कमी खा. खारट पदार्थ टाळा.

LEAVE A REPLY

*