‘मेक इन नाशिक’साठी उद्योजक, प्रशासन सज्ज महसूल आयुक्त, जिल्हाधिकार्‍याच्या बैठकीत ठरली दिशा

0

सातपूर | दि. १० प्रतिनिधी- ‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम केवळ उद्योगांसाठीच नसून सर्वच संघटनांच्या माध्यमातून नवीन गुंतवणूक आणण्यासाठीं प्रयत्न कले जाणार आहेत. त्यात प्रशासकिय स्थरावरून सर्व तो परीने सहकार्य करण्याचे आश्‍वासन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.

निमाहाऊस येथे ‘मेक इन नाशिक’ साठी कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निमाचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी, नाईस अध्यक्ष विक्रम सारडा, क्रेडाईचे माजी अध्यक्ष नरेंद्र ठक्कर, अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारीया, महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, बेदमुथा ग्रुपचे के. आर. बेदमुथा,

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन नरेंद्र गोलीया, एचएएलचे महाव्यवस्थापक बी. व्ही. राव, उपमहाव्यवस्थापक साकेत चतुर्वेदी, बॉशचे महाव्यवस्थापक मुकूंद भट, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक बळवंत जोशी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, आयइआयचे अध्यक्ष मनिष कोठारी, निमाचे माजी अध्यक्ष संजीव नारंग, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणिस उदय खरोटे, मनिष रावल, हर्षद ब्राम्हणकर, गौरव धारकर, श्रीकांत बच्छाव आदींसह उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने व नाशिकच्या सर्वच उद्योग व व्यापार संघटनांच्या सहयोगाने मुंबईत दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या ‘मेन इन नाशिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून पालकमंत्री पुढाकार घेणार आहेत.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमातून देशभरातील ५० मोठ्या उद्योगांसह परदेशी कॉन्स्युलेट जनरल्स सोबत नाशिकच्या क्षमता व संधीचे प्रदशर्न करण्याचा निर्धार करण्यात आला. या माध्यमातून १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष ठेवण्यात आले असल्याचे निमा अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी यांनी सांगितले.

या बाबतच्या आयोजनाची दिशा ठरवून विविध उपसमित्यांचे गठण करण्याची सूचना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केली. येत्या १५ दिवसांत देशभरातील मोठ्या उद्योगांची यादी काढून त्यांच्याशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचे श्री बॅनर्जी यांनी सांगितले.

यावेळी एमआयडीसीतर्फे बनवण्यात आलेल्या चित्रफितीद्वारे हेमांगी पाटील यांनी उद्योगांसाठी नाशिकच्या क्षमता स्पष्ट केल्या. त्यात कनेक्टीविटी, उपलब्ध उद्योगांचे भूखंड, वीज, पाणी, शैक्षणिक स्थिती व कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, कारगो हब, वाईन कॅपीटल, एअर कार्गो, डीएमआयसी, फ्राइट कॅरिडॉर यासारख्या विविध सुविधांची माहीती दिली.

LEAVE A REPLY

*