मृण्मयी देशपांडेने केली सुव्रत जोशीची ‘शिकार’!

0

मृण्यमयीने दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशीसोबत लग्न केले आहे.

सुव्रतनेच त्यांच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.

पण सुव्रत आणि मृण्मयीचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले नाही तर एका चित्रपटातील दृश्यादरम्यानचे हे फोटो आहेत.

शिकारी हा चित्रपट लवकरच येत असून या चित्रपटासाठी सुव्रत आणि मृण्मयी यांनी नुकतेच लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण केले.

सुव्रतने शिकारी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली आहे.

त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी लहान असताना चित्रपटात कोणाचे लग्न झाल्यास त्यांचे खऱ्या आयुष्यातही लग्न होते का हा प्रश्न मला पडायचा. तर मोठा झाल्यानंतर लोक येवढ्या धुमधडाक्यात लग्न का करतात हा प्रश्न मला पडायचा. यातील काही प्रश्नांचे उत्तर मला नुकतेच मिळाले. या वेड्या व्यक्तिसोबत चित्रीकरण करायला खूपच मजा आली.

LEAVE A REPLY

*