मूल्याकंनावर मिळणार ग्रामपंचायतींना निधी

0

14 व्या वित्त आयोगाच्या ग्रँटबाबत निकष जारी

 

मुंबई – 14 व्या वित्त आयोगाचा 15 हजार कोटी रुपयांचा निधी राज्यातील ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी ग्रामपंचायतींना सन 2017-18 ते 2019-20 या आर्थिक वर्षांच्या परफार्मन्स ग्रँटच्या वितरणाबाबतचे निकष व सनियंत्रण याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचना ग्रामविकास विभागाने जारी केल्या आहेत.

 

त्यानुसार ग्रामपंचायतींचे मूल्यमापन होणार आहे. त्यात मिळणार्‍या गुणांवरच या निधीचा मार्ग सुलभ होणार आहे. मंजुर निधीची 100 टक्के रक्कम मिळण्यासाठी ग्रामपंचायतींना 71 पेक्षा जास्त गुण मिळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे यापुढे हा निधी मिळविण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचा कस लागणार आहे.

 

चौदाव्या केंद्रित वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या बळकटीकरणासाठी राज्याला सन 2015-16 या आर्थिक वर्षांपासून पुढील पाच वर्षासाठी बेसिक ग्रँटचे 13532 कोटी व परफॉर्मन्स ग्रॅटचे 1503 कोटी अशा दोन प्रकारच्या ग्रॅॅटसच्या स्वरूपात एकूण 15035.67 कोटी इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी केवळ ग्रामपंचायत स्तरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचे सुधारित निकष जारी करण्यात आले आहेत.

 

त्यानुसार निधीसाठी ग्रामपंचायतींनी त्यांचे लेखे ठेवणे आवश्यक असून त्यांच्या अद्यायावत (दोन वर्षांच्या आतील कालावधीचे) लेखा परीक्षण करून ते सादर झालेले असावेत. लेखापरिक्षित लेख्यांवरून ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नात मागील वर्षांपेक्षा वाढ झालेली असावी. परफॉर्मन्स ग्रँट वितरणाच्या वर्षाच्या ग्रामपंचायत विकास आराखडा पूर्ण करून तो प्लस पोर्टलवर अपलोड झालेला असावा. चौदाव्या वित्त आयोगा अतंर्गत मागीलवर्षी पात्र परफॉर्मन्स ग्रँट मधून करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील क्षेत्रनिहाय केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वेबसाईटवर दर्शवावा.

 

या निकषांची पूर्तता करणार्‍या ग्रामपंचायतींचे मूल्यांकन पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. त्यासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. आर्थिक वर्षात स्वउत्पन्नात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यास 5 गुण मिळणार आहे. 10 ते 25 टक्क्यांपर्यंत 10 गुण, 25 ते 50 टक्क्यांपर्यंत 15 गुण. तर 50 पेक्षा अधिक 20 गुण मिळणार आहेत.

 

प्रमाणित लेख्यांनुसार मागील वर्षी चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत पात्र बेसिक गँ्रटच्या प्रमाणात स्वउत्पन्नाची टक्केवारी अशी- 10 टक्क्यांपर्यंत 15, 10 ते 20 टक्के 20 गुण, 20 ते 30 टक्के 30 गुण, 30 टक्क्यांपेक्षा अधिक 40 गुण. मागील वर्षांत हागणदारी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीस 30 गुण मिळणार आहेत. 2 वयाची बालकांपर्यंत पूर्ण लसीकरण झालेले असल्यास त्यासाठी 10 गुण देण्यात येणार आहे. असे एकूण 100 गुण देण्यात येणार आहे. यावर्षी असणारी हागणदारी मुक्त प्रमाणस्थापित ग्रामपंचायत ही पुढील वर्षासाठी हागदारीमुक्त असेले हा निकष लावण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*