‘मुल्क’ चित्रपटाच्या शूटिंगला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार

0

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर तापसी बॉलिवूडकडे वळली असल्याचे दिसत आहे.

सध्या ती ‘जुडवा २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच तिने आणखी एक चित्रपट साईन केलाय.

या चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘मुल्क’ असं आहे. चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्या सूनेच्या भूमिकेत दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून हा एक थरारपट असल्याचं म्हटलं जातंय. तापसीच्या पतीच्या भूमिकेत राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर दिसणार असल्याचं म्हटलं जात असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही.

पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*