मुलीच्या छेडखानीतून एकावर हल्ला

0

धुळे / शहरातील जुनेधुळे येथील इयत्ता सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या वादातून जुने धुळ्यातील बालगोपाल विजय व्यायाम शाळेच्या चौकात दि.4 मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान मुलीच्या वडीलांनी प्रशांत राजेंद्र खोंडे (वय 17) या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला.

यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने जुनेधुळ्यात तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी दोघांविरुध्द जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून जखमी प्रशांत खोंडेविरुध्द मुलीच्या फिर्यादीवरुन भादंवि 354, 354 (अ), 354 (ड) (1), 106 तसेच लैगिंक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम नुसार आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*