मुलींना फुस लावुन पळविणारी ‘गँग’ सक्रीय

0
जळगाव । दि.14। प्रतिनिधी- शहरातील समतानगरमधील अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून तसेच फुस लावुन पळवून घेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
यासाठी टोळी सक्रिय झाल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली असून त्या ‘गँग’चा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
समतानगर परिसरातून चार अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची महिनाभरात घटना घडली आहे. याप्रकरणी पालकांनी हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दिल्या आहेत.

तक्रार देवूनही योग्य ती कार्यवाही होतांना दिसत नसल्याने परिसरातील काही पालकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात जावून आपली कैफियत मांडली.

मुलींना फुस लावून पळवून नेणारी टोळीच परिसरात सक्रिय आहे.त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यक्त होवू लागली आहे.

अल्पवयीन मुलीस आमिष दाखविणे, नंतर तिचा विश्वास संपादन करणे, मग तिचा विश्वासघात करणे अशा पध्दतीने हा गैरप्रकार सुरू असल्याने अनेक पालक भयभीत झाले असल्याची आपबिती पालकांनी पोलिस मुख्यालयात सांगितली.

तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष
घरात मुलीचे अपहरण झाल्यानंतर मुलीचे कुटूंबिय पोलीसांत तक्रार देतात. मात्र पोलीसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले. मुलीबाबत इत्यंभूत माहिती देवून पोलीस तपास करीत नसल्याची खंत देखील पालकांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

*