मुलाने केला बापाचा खून

0

बोदवड / तालुक्यातील राजुर येथे जाट मोहल्यात मुलाने बापाच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन खून केल्याची हि घटना दि.6 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

खुनाच्या घटनेची वार्ता गावात पसरताच खळबळ उडाली. याबाबत सायंकाळी बोदवड पोलिसात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल धनसिंग जाट (वय 32) यास त्याचे वडील धनसिंग उत्तमसिंग जाट यांनी मारहाण केली होती.

याचा राग येवून मुलगा अनिल याने आपल्या वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर लोखंडी फावडे मारुन खून केल्याची घटना दि. 6 रोजी सकाळी 6 वाजता घडली.

धनसिंग जाट हे नुकतेच पत्नी आनंदाबाई यांच्या खुनाची शिक्षा भोगून घरी आले होते. त्यांच्या नावावर शेतजमिन होती. त्या जमिनीवर अनिलला कोणतेही कर्ज मिळत नव्हते, ती जमीन नावावर करण्यासाठी सुध्दा त्याने प्रयत्न केले होते, अशी गावात चर्चा आहे.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळचे सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दुपारी भेट देवून घटनेविषयी माहिती घेतली.

याबाबत शांताराम उत्तमसिंग जाट यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अनिल जाट विरुध्द गु.र.नं. 24/17, भा.दं.वि. 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत बनकर करीत आहे. बोदवड तालुक्यात मुलाने बापाचा खुन करण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

*