मुलाच्या भविष्यासाठी संघर्ष – पेट्रोलपंपावर नोकरी करणार्‍या सुनिता पाटील यांनी उलगडले संघर्षाचे पैलू

0

देवेंद्र पाटील : जळगाव :  मुलाच्या भविष्यासाठी मनात न्युनगंड न बाळगता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी शिवाजीनगरातील सुनिता पाटील या महिलेनी खाजगी नोकरी पत्करुन आपल्या संघर्षमय जिवनाचा गाडा लिलया पेलत आहे.

केवळ मुलाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी अतिशय कठीण परिस्थितीतून मात करत यशस्वी झाल्याची संघर्षमय कहाणी सुनिता पाटील यांची आहे. जागतिक महिलादिनानिमित्त त्यांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधल असता त्यांनी आपल्या जीवनातील सर्ंघषाचे पैलू उलगडले.

शिवाजीनगरमध्ये सुनिता पाटील या आपल्या मुलासह राहतात. गेल्या चार वर्षापासून पुष्पलता बेंडाळे चौकातील पारस पेट्रोलपंप येथे खाजगी नोकरी करीत आहेत. पती विभक्त झाल्यानंतर दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी कशी पार पाडावी, याबाबतचा प्रश्‍न निर्माण झाला.

परंतु पदरी आलेल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास अनेक अडचणीतून त्या पार करीत आहेत. कामाशी प्रामाणिकता आणि समाजातील प्रत्येक घटकांना सन्मान देणे या विचारांमूळे  सुनिता पाटील ह्यांनी एक एक यशाची पायरी सर केली. समाजात महिलांसमोर अनेक आव्हाणे असतात.

परंतु सुनिता पाटील यांनी या आव्हाणांवरही मात करत आणि कुठल्याही कामात कमीपणा न वाटून घेता. केवळ मुलाचा शिक्षणाची जबाबदारी पार पाडावी, म्हणून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याची खाजगी नोकरी पत्करली. धुळे येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आपण पेट्रोल पंपावर काम का करावे? असा प्रश्‍न कधीही निर्माण झाला नाही.

शेवटी स्वत:चा कुटूंबासाठी आणि मुलाचा शिक्षणासाठी ते काम देखील अतिशय आनंदाने स्वीकारुन मुलाचे बीएससीपर्यंत शिक्षण सुनिता पाटील यांनी पूर्ण केले.

आपल्याला एखादा डोंगर चढायचा असेल तर प्रयत्न करणे, त्यात सातत्य ठेवणे महत्वाचे असते. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ प्रयत्नार्थी परमेश्‍वर असतो या आशेने प्रवास करीत असल्याची संघर्षमय कहाणी सुनिता पाटील यांनी यावेळी उलगडली.

LEAVE A REPLY

*