मुसळी फाट्याजवळ अपघातात धुळे ग.स.चा कर्मचारी ठार

0
जळगाव । प्रतिनिधी-धुळे ग.स. बँकेचे कर्मचारी यांच्या दुचाकीला आयशरने धडक दिली. ही घटना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास महामार्गाजवळील मुसळी फाट्याजवळ घडली. या अपघातात ग.स. बँकेच्या कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील रहिवासी असलेले सुरेश लोटन भदाणे (वय 38) हे धुळे, नंदूरबार ग.स. (जळगाव शाखा) बँकेत आहेत.
जळगावातील गणेश कॉलनीमध्ये सुरेश भदाणे हे पत्नी ज्योती, मुलगी खुशी (वय 15), मुलगा मयंक (वय 7) यांच्यासह गेल्या 10 वर्षापासून राहतात.

सुरेश भदाणे हे त्यांच्या दुचाकी (क्र.एम.एच. 19 – 2079) ला आयशरने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना नागरीकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जिल्हा रुग्णालयात ग.स. बँकेचे कर्मचार्‍यांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. नूतन मराठा महाविद्यालयातील प्रा.बी.डी. पाटील यांचे ते लहान शालक होते.

याप्रकरणी पाळधी औटपोस्टमध्ये आयशर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

 

 

LEAVE A REPLY

*