मुद्रा बँक योजनेच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांची मदत घेणार

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-मुद्रा योजनेची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी तसेच युवकांना रोजगारासाइी अर्थसाहाय्य करण्यार्‍या मुद्रा बँक योजनेचा प्रचार व त्याची प्रसिद्धी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचे आदेश जिल्हा स्तरीय मुद्रा बँकेच्या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हाकौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक अनिसा तडवी, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहा. प्रकल्प संचालक डॉ. प्रभाकर शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. व्ही. दामले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी.एम कोठावदे, वाय. एस. पाटील, एस.एस. इखारे, श्याम अग्रवाल, सागर धनाड, सुलोचना पाटील, हर्षाली जगताप, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.

बैठकीत समितीने गेल्या आर्थिक वर्षात राबविलेल्या प्रसिद्धी विषयक उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. तसेच येत्या आर्थिक वर्षात राबविण्यात येणार्‍या प्रसिद्धीविषयक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

यामध्ये मुद्रा योजना ही अधिकाधिक रोजगारक्षम युवकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असुन त्यात युवकांचाच अधिकाधिक सहभाग घ्यावा.

त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व तालुका पातळीवरील महाविद्यालये येथील युवक युवतींचे पथनाट्य पथके तयार करुन त्यांच्यामार्फत शहरीसह ग्रामीण भागातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

*