मुदत संपलेल्या २१ मार्केटमधील गाळ्यांची माहिती नगरसचिवांकडे सादर

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मनपाची मालकी असलेली असलेल्या २१ मार्केटमधील २ हजार ४३४ गाळ्यांची माहिती महापालिकेकडून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. गाळ्यांबाबत आयुक्त सोनवणे यांनी नगरसचिवांची भेट घेवून गाळ्यांचा विषय मार्गी लावण्याची मागणी केली असल्याने हि माहिती सादर करण्यात येणार आहे.

शहरातील महापालिकेच्या मालकी असलेल्या १८ मार्केटमधील सुमारे २ हजार १७५ गाळे भाडे कराराची मुदत संपली असून मुदत संपलेल्या गाळेधारकांना कलम ८१ ब च्या नोटीस देण्यात आल्या होत्या. यानतंर आता एकुण २१ मार्केटमधील २ हजार ४३४ गाळ्यांच्या मुदती संपल्या आहेत.

मुदत संपून देखिल या गाळ्यांबाबत अद्याप कुठला निर्णय झालेला असून. मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव किंवा प्रमियम घेवून नुतनीकणाचे अनेक ठराव झाले आहेत. मात्र शासनाने या प्रश्‍नवार कोणताही निर्णय न दिल्याने हा विषय रखडला आहे. तसेच यासंदर्भातील ४० क्रमांकाच्या ठरावाला शासनाने स्थगिती दिल्याने या मार्केटमधील गाळयांचे भाडे देखिल थकले आहे.

याबाबत नुकतीच आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची भेट घेवून त्यांना याबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाला आता मुदत संपलेल्या मार्केटची माहीती प्रशासनाकडून सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*