मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बदली स्थगित

0
नंदुरबार / येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे व त्यांच्या जागी नियुक्ती झालेले नगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवाडे या दोघा अधिकार्‍यांच्या बदल्यांना राज्यशासनाने स्थगिती दिली आहे.
येथील मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे यांनी दि.1 मे 2016 पासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता.

मात्र, दि.7 जून रोजी त्यांची नगर येथील महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जागी नगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परंतु आज दि.8 जून रोजी पुन्हा या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदल्यांना सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी स्थगिती दिली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत दोघा अधिकार्‍यांना त्याच पदांवर कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*