मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या प्रतिमेस चपलांचा हार

0

भुसावळ / देशभरात अस्वच्छतेच्या बाबतीत भुसावळचा दुसरा क्रमांक आल्याने जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याला वंदन करून मुख्य चौकात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घालून निषेध व्यक्त केला.

अकार्यक्षम सत्ताधार्‍यांविषयी तसेच मुख्याधिकारी हटावची मागणी करण्यात आली.

भारत स्वच्छ अभियानांतर्गत देशभरातील 434 शहरांचा सर्वे करण्यात आला होता.

त्यात अस्वच्छतेच्या बाबतीत देशभरात भुसावळचा दुसरा क्रमांक आल्याचे गुरुवारी नवी दिल्ली येथे जाहीर झाल्यानंतर भुसावळच्या सोशल मीडियात सत्ताधारी व नगरपालिका प्रशासनाविषयी शेलक्या शब्दात टीका करण्यात आली होती.

त्या पार्श्वभूमीवर माजी आ.संतोष चौधरी यांनी शुक्रवारी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली होती.

शुक्रवारी दुपारी 12.05 वाजता यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जनआधारचे सर्व नगरसेवक तथा पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर यावल रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पालिकेच्या वीज खांबावर मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रतिमा ठेवून त्यांना चपला-बुटांचा हार घालण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*