मुकुंदनगरमधील नागरिकांचा आयुक्त कार्यालयात ठिय्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – टॉपअप पेट्रोल पंप ते संजोगनगर रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली अनेक दिवसापासून खोदून ठेवला आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करवा लागत आहे. रस्त्याचे काम रखडल्याच्या निषेध म्हणून मुकुंदनगरचे नगरसेवक फैय्याज शेख यांच्यासह परिसरातील महिलांनी आज गुरूवारी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्याबाबतच्या समस्या उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्या समोर मांडल्या.आंदोलकांनी रस्त्यावर खोदलेला खड्डा त्वरीत बूजवावा अशी मागणी केली.

गतअनेक महिन्यापासून मुकुंदनगर, संजोगनगर भागात सुवर्णजयंती अतर्ंगत रस्त्याचे काम सुरू आहे. या कामसाठी संबंधीत ठेकेदाराने रस्ता संपूर्णपणे खोदून ठेवला आहे. दुरूस्तीच्या नावाखाली रस्त्यावर खड्डा खोदला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाताना अनेक किरकोळ अपघात होत आहे. परिसरात राहणारे वृध्द नागरिक, महिला, मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी खड्ड्यात चिखल होते. ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यामधील खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहने चालविणेही कठिण झाले आहे. दलदलीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला.

LEAVE A REPLY

*