Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुंबई नाका पोलिसांतर्फ़े मुस्लिम बहुल परिसरात कोरोनाबाबत जनजागृती

Share

नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील नागजी चोक, पखाल रोड, उस्मानिया चौक येथील मुस्लिम वसाहतीत तसेच मशिदी व परिसरात पोलिस उपायुक्त अमोल तांबे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव व मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये करोना बद्दल जनजागृती केली.

यावेळी आयशा मशिदचे पेश इमाम व फैजाने ओलीया मशिदीचे इमाम यांनी नागजी चोक येथे नाका बंदी दरम्यान मुस्लिम जनतेला घराबाहेर न पडण्याचे आव्हाहन केले.

तसेच परिसरातील सर्व मशिदीमधील इमाम हे मशिदिमधून मुस्लिम जनतेला दररोज संचारबंदी दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन दररोज करीत आहेत.

दरम्यान आज उर्दू शाळेचे शिक्षक व पत्रकार मंडळी देखील जनजागृती मध्ये आपापल्या पद्धतीने सहभागी झाले होते. यामुळे परिसरातील लोकांमध्ये एक चांगला परिणाम दिसून आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!