मुंबई : वडाळा भागात भीषण अपघात; मोर्चातून परत येताना तरुणांच्या बाईकला ट्रकची धडक

0

मुंबईमधील वडाळा भागात ट्रकच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे.

विनायक ढगे, सिद्धेश मासे अशी मृत तरुणांची नावं आहेत, तर सिद्धेश चव्हाण अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

मराठा मोर्चात सामील होऊन घरी परतत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ड्रायव्हर मोहम्मद कलीम शेख याची वैद्यकीय तपासणी केली असून, अपघातावेळी ड्रायव्हर दारु प्यायला होता का, याची चौकशीही पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

*