मुंबई- पुणे महामार्ग : टोल 230 रुपयांचा अन कार्डमधून गेले 87 हजार रुपये!

0

टोल नाक्यावर डेबिट कार्ड स्वाईप करणं दर्शन पाटील या 36 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं.

खालापूर टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल डेबिट कार्डद्वारे भरल्यानंतर, काही तासातच त्याच्या अकाऊंटमधून तब्बल 87 हजार रुपये गायब झाले.

दर्शन पाटील हे शनिवारी 9 सप्टेंबरला मुंबईहून पुण्याकडे जात होते. त्यावेळी त्यांनी खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केलं. कार्डद्वारे त्यांनी संध्याकाळी 6.27 वाजता 230 रुपयांचा टोल भरला. पण त्यांनंतर 8.31 वा त्यांना अकाऊंटमधून 20 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर काही क्षणातच 6 मेसेज आले. अशाप्रकारे त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल 87 हजार रुपये गेले होते. 

महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी जे ट्रान्झॅक्शन केले, त्यावेळी दर्शन पाटील यांना कोणताही ओटीपी (OTP) आला नाही. त्यामुळे दर्शन पाटील मोठ्या संभ्रमात आहेत.

LEAVE A REPLY

*