मुंबई एअरपोर्टवर लँडिंगवेळी ऐतिहाद एअरवेजच्या विमानाचे टायर फुटले

0

मुंबई एअरपोर्टवर लँडिंग करतानाच ऐतिहाद एअरवेजच्या विमानाचे टायर फुटले.

या विमानात क्रू सदस्यांसह 200 प्रवाशी होते.

ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर मुख्य रनवेवरील संचालन बंद करण्यात होते.

एअरपोर्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीहून आलेल्या एका विमानाचे टायर अचानक फुटले.

टायर फुटताच विमान रनवेवरच थांबले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. नंतर इतर विमाने दुसर्‍या रनवेवर वळवण्यात आले होते. ही दुर्घटना काल (सोमवारी) सायंकाळी सात वाजता घडली.
– विमानात 196 प्रवासी आणि 13 क्रू सदस्य होते.
– ऐतिहाद एअरवेजने याघटनेबाबत अद्याप कोणतीही टिप्पणी दिलेली नाही.
– मुंबई एअरपोर्टवर दोन रनवे आहेत. मुख्य रनवेवर ही घटना घडली.
– या घटनेनंतर विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्‍यात आले होते.

LEAVE A REPLY

*