मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

0

मुंबईसह ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कळवा स्थानकाजवळ पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन मंदगतीने धावत होत्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. जलद मार्गावरील वाहतूकही विलंबानेच सुरु होती.

LEAVE A REPLY

*