मुंबईत बुधवारी समितीची बैठक

0
जळगाव  / हुडको कर्जप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कामकाज झाले. नागरीहित लक्षात घेवून शासन हुडको आणि मनपा प्रशासनाने बैठक घेवून तोडगा काढण्याची सुचना मुंबई उच्च न्यायालयाने केली.
त्यामुळे मंत्रालयात दि.14 रोजी समितीची बैठक होणार आहे.
घरकुलसह विविध योजनांसाठी तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती.
डीआरटीने 341 कोटीची डिक्री नोटीस बजावून तब्बल 50 दिवस मनपाचे सर्व बँक खाते सील केले होते. त्यानंतर मनपाने मुंबई उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका दाखल केल्यानंतर डिक्री नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देवून दरमहा 3 कोटी हप्ता अदा करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, दरमहा अदा करण्यात येणारी रक्कम पूर्ण झाली असून हप्ता भरण्यास स्थगिती द्यावी, यासाठी मनपाने याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या.गवई, न्या.छगला यांच्या न्यायपीठासमोर कामकाज झाले. यावेळी मनपा प्रशासनाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या बैठकीबाबत माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.

दरम्यान, नागरीहित लक्षात घेवून समितीने तोडगा काढावा, अशी सुचना शासन, हुडको आणि महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाने दिली.

त्यानुसार मंत्रालयात दि.14 रोजी समितीची बैठक होणार आहे. या समितीत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह हुडको आणि मनपा आयुक्त यांचा समावेश आहे. मनपातर्फे अ‍ॅड.नितीन ठक्कर तर हुडकोतर्फे अ‍ॅड.व्ही.जी.कुमार काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*