मुंबईत एसी लोकल सप्टेंबर महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार

0

मुंबईकरांना प्रतिक्षा असलेली एसी लोकल येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

खरंतर एप्रिल २०१६ मध्येच एसी लोकल मुंबईत दाखल झाली होती. मात्र, तेव्हापासून काही तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे एसी लोकलने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न अधुरेच राहिले होते.

रेल्वे मंडळाचे सदस्य रवींद्र गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, आम्ही सप्टेंबर महिन्यात एसी लोकल सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत.

त्यानंतर लवकरच पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नऊ डब्यांची एसी लोकल चालवण्याचाही आमचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एसी लोकलसाठीचे तिकीट दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.

LEAVE A REPLY

*