मुंबईत आता ऑनलाईन पार्किंग बूक करा!

0

मुंबईत तुम्ही आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पार्किंगची जागा ऑनलाईन बूक करू शकणार आहात.

मुंबई महानगरपालिकेने अॅपची तसंच ऑनलाईन पार्किंग बूक करण्याची व्यवस्था केली आहे.

पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील आठ वाहनतळांवर ही सुविधा पुढच्या तीन महिन्यांत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्किंगची व्यवस्था : 

  • तुमचं वाहन कोणत्या वाहनतळावर पार्क करायचे याचा निर्णय वाहनधारकाला तिथे पोचण्यापूर्वीच घेता येईल.
  • वेबसाइट किंवा अॅपवर बुकिंग केल्यानंतर वाहनधानकारला पत्ता, जागा क्रमांक, बु‌किंगचा कालावधी, वाहनक्रमांक हे तपशील मोबाइलवर मेसेजद्वारे मिळतील. तोच मेसेज वाहनतळावर कार्यरत कर्मचाऱ्यालाही जाईल.
  • अॅपद्वारे वाहनचालकाला वाहनतळापर्यंत पोचण्याचा मार्गही जीपीएसच्या सहाय्याने दिसू शकेल.
  • वाहनतळावर पोचल्यानंतर उपस्थित कर्मचारी वाहन क्रमांकाची खातरजमा करून पार्किंगसाठी जागा करुन देतील.
  • बुकिंग केल्यानंतर निर्धारित कालावधीत वाहन आलं नाही तर त्याचे ऑनलाइन बुकिंग रद्द होऊन ते अन्य वाहनासाठी मिळेल.

LEAVE A REPLY

*