मुंबईतून २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता

0

मुंबईतून २६ पाकिस्तानी नागरिक मागील ३ आठवड्यांपासून बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे.’

गायब झालेल्या पाकिस्तानींमध्ये मागील १० वर्षांपासून जुहू येथे चहाचे दुकान असलेल्या एका व्यक्तीचाही समावेश आहे.

भारतात येणाऱ्यां पाकिस्तानी नागरिकांना ते भारतात ज्या व्यक्तींना भेटायला येणार आहेत. त्या व्यक्तींची माहिती ‘सी’ फॉर्ममध्ये दिलेली नव्हती, असे या वृत्तात म्हटले आहे.

गुप्तचर यंत्रणांनी जेव्हा या पाकिस्तानींचा शोध सुरू केला, तेव्हा ही माहिती समोर आली.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) या पाकिस्तानींचा शोध सुरू आहे. हे पाकिस्तानी बेपत्ता झाल्याची माहिती एटीएसला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. भारतीय सुरक्षा दलांना याबाबतचे धागेदोरे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयमधील सूत्रांकडून मिळाली होती, असे या वृत्तात म्हटले आहे.

सी फॉर्ममध्ये पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्यांना मुक्कामाचे ठिकाण, ते किती दिवस थांबणार आहेत, पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत आणि निवासी परवान्याबाबत सर्व माहिती द्यावी लागते. या सर्व २६ पाकिस्तानींनी सी फॉर्म अर्धवट भरल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. एटीएस मुंबईतील सर्व हॉटेल आणि लॉजमधून या लोकांचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

*