मी सैनिकांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही : लष्करप्रमुख

0

दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मीरी तरुणाला ढाल बनवणारे मेजर लीतुल गोगोई यांच्या लष्कराकडून करण्यात आलेल्या सन्मानामुळे भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावेल, असे मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे.

काश्मीरमध्ये सध्या ‘डर्टी वॉर’ सुरू आहे.

या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असली तरी दहशतवादाने पोखरलेल्या राज्यांमध्ये लष्कराचे मनोबल वाढवणे गरजेचे असल्याचे रावत म्हणाले. काश्मीरध्ये लष्कराला बचावाचे नवीन मार्ग शोधावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत लष्करप्रमुख रावत यांनी काश्मिरातील सद्यस्थितीतबाबत परखड भाष्य केले होते.

ते म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यात सध्या प्रचंड प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. जमाव आमच्यावर दगडफेक करतो. वस्तुत या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल.

कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे, ते करता येईल. खोऱ्यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षांव करते.

अशावेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही.

 

LEAVE A REPLY

*