Type to search

क्रीडा

मी सुद्धा कठीण काळातून गेलो आहे : विराट

Share

इंदूर । क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं सध्या ब—ेक घेतला आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी तो सामना करत आहे. त्यामुळे आता आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असून, त्याने क्रिकेटमधून ब—ेक घेतला आहे. क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयुष्यातील कठीण काळ उलगडला आहे. ममी सुद्धा अशा कठीण काळातून गेलो आहे. त्यावेळी माझे जग आता संपले आहे असे विचार मनात आले होते,फ असे विराट म्हणाला.

इंग्लंडचा स्टीव्ह हार्मिसन, मार्कस ट्रेस्कोथिक आणि ग—ीम फाउलर आदींसारखे खेळाडूही या प्रसंगातून गेले आहेत. याबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला. ममाझ्या मनातही असे वाईट विचार आले होते. पण त्यावेळी त्यांच्याशी लढायचे कसे हे ठाऊक नव्हते,फ असे तो म्हणाला. बांगलादेश आणि भारत यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत त्याने आपले मत मांडले. यावेळी त्याने ग्लेन मॅक्सवेलचे कौतुक केले. मानसिक आरोग्यासंबंधीची बाब स्वीकारणे हे उल्लेखनीय आहे, असे तो म्हणाला.

जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता. त्यावेळी संघातील प्रत्येक खेळाडूला अशा संवादाची गरज असते, जे त्याला बोलण्यासाठी प्रेरित करतो. ग्लेन मॅक्सवेलने जे केले ते उल्लेखनीय आहे असे मला वाटते, असेही तो म्हणाला. विराटने यावेळी 2014 साली झालेल्या इंग्लंड दौर्‍याचा उल्लेख केला. ममी सुद्धा या कठीण काळातून गेलो आहे. आता सगळे संपले असे त्यावेळी मला वाटले होते. काय करायचे आणि काय बोलायचे हे मला ठाऊक नव्हते, असे त्याने सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!