मी बॉलिवूड सोडून कुठेही जाणार नाही : प्रियंका चोप्रा

0

प्रियंका चोप्राला टोरॅँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘टीआयएफएफ’च्या वतीने आयोजित शेअर हर जर्नी समारंभात गेस्ट आॅफ आॅनरने सन्मानित करण्यात आले.

असा सन्मान मिळालेली प्रियंका ही बॉलिवूडमधील पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.

यादरम्यान तिच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीत प्रियंकाने स्पष्ट केले की, मी बॉलिवूड सोडून कुठेही जाणार नाही. केवळ ‘क्वांटिको’च्या एक्सटेंडेड प्रोजेक्टमुळे मी हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. याचा अर्थ मी बॉलिवूड सोडले, असा होत नाही.

पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, पुढच्या वर्षी मी दोन बॉलिवूडपटांमध्ये काम करण्याचे निश्चित केले आहे. मात्र जोपर्यंत हे चित्रपट साइन करीत नाही, तोपर्यंत याविषयी काहीही सांगणे योग्य नाही.

LEAVE A REPLY

*