मिराबाईचे कांस्य तांत्रिक नियमांमुळे हुकले

0
दिल्ली । मिराबाईने यंदाच्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतील 49 किलो वजनी गटात तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली. तसेच कांस्यपदक विजेत्या खेळाडूइतकेच 199 किलो वजनदेखील उचलले. मात्र तांत्रिक नियमांचा फटका बसल्याने तिला कांस्य पदकापासून वंचित राहावे लागले.

मिराबाईने तिच्या याआधीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (192 किलो) तब्बल 7 किलो अधिक वजन या स्पर्धेत उचलले. त्यात 86 किलो स्नॅच आणि 113 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 199 किलो वजन उचलले. चीनच्या झँग रोंगनेदेखील 199 किलो वजन उचलले. त्यात 88 किलो स्नॅच आणि 111 किलो क्लिन अँड जर्क प्रकारातील होते. मात्र 2017पासून झालेल्या नियमांनुसार जेव्हा अशी समसमान स्थिती येते, त्यावेळी ज्या खेळाडूने क्लिन अँड जर्कमध्ये कमी वजन आणि स्नॅचमध्ये अधिक वजन उचलले असेल त्याला पदक देण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे चीनच्या झँगला कांस्यपदक तर मिराबाईला चौथा क्रमांक मिळाला.

पण आशियाई स्पर्धामध्ये क्लिन अँड जर्क प्रकारात अधिक वजन उचलणार्‍याला पदक देण्याची पद्धत असल्याने मिराबाईला या वर्गातील कांस्यपदक देण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये केवळ एकूण गुणसंख्येआधारे अव्वल असणार्‍यांनाच पदक देण्याची परंपरा आहे. 49 किलोच्या या वजनी गटात 208 किलो वजन उचललेल्या चीनच्याच होऊ झिहुइला सुवर्णपदक तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गम हिला 200 किलो वजनासाठी रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

*