मिताली राजला ‘बीएमडब्ल्यू’ कार भेट

0
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
त्यातच भारतीय संघाची कर्णधार मिताली राजला तेलंगणा बॅडमिंटन संघाचे उपाध्यक्ष व्ही. चामुंडेश्लवरनाथ यांनी बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस म्हणून दिली.
चामुंडेश्लवरनाथ स्वत: आंध्र प्रदेशकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. आंध्र प्रदेशच्या टीमचे ते कर्णधारही होते. चामुंडेश्लवरनाथ आता व्यावसायिक आहेत.
मिताली राजला बीएमडब्ल्यू द्यायची घोषणा त्यांनी वर्ल्डकप सुरु असतानाच केली होती.
याआधी २००७ साली चामुंडेश्लवरनाथ यांनी मिताली राजला शेवरले कार गिफ्ट दिली होती.
मितालीबरोबरच त्यांनी पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक यांना ऑलिम्पिक मेडल जिंकल्याबद्दल आणि दीपा करमाकरला ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बीएमडब्ल्यू कार गिफ्ट दिली होती.

LEAVE A REPLY

*