माहेश्वरी प्रीमियर क्रेझी क्रिकेट लिगचे थाटात उद्घाटन

0

बांगडीवाला प्रायोजित स्पर्धेचा उद्योजक जितेंद्र व महेश बिहाणी यांच्या हस्ते प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – महेश नवमीचे औचित्य साधून माहेश्वरी युवक मंडळाने नगर क्लब येथे आयोजित माहेश्वरी प्रीमियर लिग (एमपीएल) क्रेझी क्रिकेटचा शुभारंभ मुख्य प्रायोजक बांगडीवाला उद्योग समूहाचे जितेंद्र व महेश बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रामकृष्ण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीगोपाल धूत, पतसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मिकांत झंवर, समाजातील मान्यवर मोहनलाल मानधना, चंद्रकांत गट्टाणी, मधुसूदन सारडा, मुरलीधर बिहाणी, श्रीगोपाल जाखोटिया, भूषण मालू, दीपक भंडारी, बलदेवजी झंवर, राजेंद्र चोपडा, योगेश मालपाणी माहेश्वरी युवाध्याक्ष अमित काबरा, सचिव शाम भुतडा,किरण मनियार,मनिष सोमाणी, निखील मालू,संग्राम सारडा उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र बिहाणी म्हणाले की, क्रेझी क्रिकेटच्या स्पर्धेतून खेळाचा आनंद घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. स्पर्धा ही खेळ आणि मैदानापुरतीच ठेऊन एकमेकांना सतत सहकार्य करण्याची भावना यातून निर्माण झाली तर समाज उन्नती वेगाने होईल.
स्पर्धेत सहभागी संघ मानधना रॉयल -पराग मानधना, भिंगारवाला चॅम्पियन- कमलेश भिंगारवाला, सुमेर स्मॅशर्स -श्रीगोपालजी जाखोटिया, देवाज टायगर -पवन धूत, राजलक्ष्मी रॉयल- आनंद अग्रवाल, वैष्णवी रायझर -नितिन बजाज, इपिटोन इंटरप्रिनरर्स- अनुराग धूत, पी पी इलेव्हन -पवन झंवर या टीमच्या ओनरचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कमलेश भंडारी, रोशन चोरडिया, ईश्वर बोरा, गौतम मुनोत, गिरीश अग्रवाल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात युवाध्यक्ष अमित काबरा यांनी सर्वांचे स्वागत केले. खेळाचे महत्व व सामाजिक बांधिलकीच्या वृद्धीसाठी या स्पर्धेचा निश्चित फायदा होतो. गेल्या चार वर्षांपासून अशा स्पर्धांना सतत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी योगेश बजाज, धीरज डागा, सुमित बिहाणी, गोविंद सोमाणी, विशाल झंवर,मुकुंद धूत,महेश हेडा, पवन बिहाणी,पावन बंग, व सर्व सदस्य कार्यरत आहेत. सूत्रसंचालन राजेश सोमाणी व महेश इंदाणी यांनी केले तर आभार मनिष सोमाणी यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*