‘माहेरची साडी’चा सीक्वल येणार!

0

१९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती करण्याचा विचार केला जात आहे. ९०च्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.

२६ वर्षानंतर दिग्दर्शक विजय कोंडके हे या चित्रपटाच्या सीक्वलच्या निर्मितीवर काम करीत आहेत.

चित्रपटाची पटकथा तयार असून, कलाकार व तंत्रज्ञ यांची निवड करताच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. विजय कोंडके हे दिवंगत अभिनेता दादा कोंडके यांचे पुतणे आहेत.

दरम्यान, एका वृत्तपत्राशी बोलताना विजय कोंडके यांनी म्हटले की, सध्या मी या चित्रपटाच्या कथेवर काम करीत असून, हे काम पूर्ण होताच, कलाकारांची निवड केली जाणार आहे.

‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या अखेरीस अलका कुबलचे निधन झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र तिच्या मुलीचे काय होते, याच अनुषंंगाने कथा पुढे दाखविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटातील कलाकारांविषयी त्यांनी अद्यापपर्यंत खुलासा केला नाही.

LEAVE A REPLY

*