Type to search

नंदुरबार

मावशी केळकर यांचे कार्य युवतींसाठी प्रेरणादायीः अर्चना अर्थेकर

Share

नंदुरबार । राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांचे कार्य युवतीसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवेकरीता स्वत:ला वाहून घेत कार्य करणारा स्वंयसेवक आज घडला आहे. प्रतिकुल परिस्थितीतही न घाबरता नजरेने घायाळ करण्याची क्षमता शाखेतून प्राप्त होते. समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आदर्श जीवन जगण्याचा संकल्प नवरात्री निमित्त अष्टभूजेकडे करू या असे आवाहन अर्चना अर्थेकर यांनी केले.

नंदुरबार येथील राष्ट्रसेविका समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मातृवंदना सघोष संचलनाचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून अश्वस्वार युवती आणि पथसंचलनात युवती व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पथसंचलनाचा समारोप डि.आर.हायस्कुच्या प्रांगणात झाला. याठिकाणी भारतमाता आणि मावशी केळकर, ताई आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन उद्योजक नितेश अग्रवाल, नलीनी रोकडे, अर्चना अर्थेकर, स्मिता वावदे, विद्या अभ्यंकर, मेघा कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्चना अर्थेकर म्हणाल्या की, वंदनीय मावशी केळकर या प्रेमळ तशाच कणखर स्वभावाच्या होत्या.

राष्ट्रसेविका समितीच्या विचाराने व ध्येयाने प्रेरीत होवून त्यांनी समाजावर राष्ट्रावर आणि मुलांवर योग्य संस्काराचा परिपाठ दिला. सेविका म्हणून समाजात वावरतांना द्वेष, मत्सर विसरून सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थीनीनी आत्मसात करण्याचे आवाहन अर्चना अर्थेकर यांनी केले.नलीनी रोकडे यांनी सांगितले की, राष्ट्रसेविका समिती म्हणजे शिस्त आणि सुशासन असे समिकरण आहे.असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रसेविका समितीचे अमृत महोत्सवीवर्ष आणि ताई आपटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर व जिल्ह्यात स्त्री शक्तीचा जागर करण्यात येईल. अशी माहिती विद्या अभ्यंकर यांनी देऊन ऋणनिर्देश केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली खेडकर यांनी केले. सघोष पथसंचलन आणि समारोप समारंभ यशस्वीतेसाठी राष्ट्रसेविका समितीच्या युवती, महिला यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!