माल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवणार

0
भारतात अब्जावधींचे कर्ज बुडवून ब्रिटनला स्थायिक झालेल्या विजय माल्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाणार आहे.
भारतात आणल्यानंतर विजय माल्याला कुठे ठेवणार आणि त्या तुरुंगात काय व्यवस्था आहे, याचा तपशील भारताने लंडनच्या कोर्टात दिला आहे.
त्यानुसार, 26/11 हल्ल्याचा एकमेव जीवंत पकडलेला आणि नंतर फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब ज्या बॅरकमध्ये होता, त्याच बॅरकमध्ये माल्याला ठेवले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी कोर्टात याबाबतचा अहवाल सोमवारी लंडनच्या न्यायालयात दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*