मार्जिनमध्ये भरघोस वाढ

0

रेशन दुकानदारांकडून निर्णयाचे स्वागत

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध मागण्यांबाबत फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्यावतीने दुकानदारांनी 1ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. दुकानदारांची मुख्य मागणी मार्जिनमध्ये वाढ करावी या मागणीची दखल घेऊन रास्त भाव दुकानदारांना शासनाने मार्जिनमध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी स्वागत केले आहे.

 

रास्त भाव दुकानदारांना एपीएल राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू, तांदूळ, साखर व भरड धान्याच्या वितरणासाठी सध्या मिळत असलेल्या 70 रुपये प्रति क्विंटल या मार्जिनमध्ये 80 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये इतके मार्जिन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ही वाढीव दराने मार्जिन अन्नधान्य व साखर विक्री ऑनलाईन व्यवहाराद्वारे करणार्‍या रास्त भाव दुकानदारांना लागू केली जाईल असाही निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून दुकानदारांच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मार्जिनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

 

संपकाळात दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, कार्याध्यक्षा मीनाताई कळकुभे, सचिव रज्जाक पठाण व तालुकाध्यक्षानी विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कडिर्र्ले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार स्नेहलताताई कोल्हे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जयंतराव ससाणे, माजी आमदार मधुकरराव पिचड, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदींना निवेदन देऊन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सहानुभुतीपूर्वक विचार करण्याची विनंती केली होती. नामदार राधाकृष्ण विखे पा., खासदार दिलीप गाधी, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या प्रश्नावर अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी संपर्क करून दुकानदारांच्या मागण्यांबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या नुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही भरघोस दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

शासनाच्या या निर्णयाचे दुकानदारांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पुरवठा मंत्री गिरीश बापट तसेच फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, खजिनदार विजय गुप्ता, निवृत्ती कापसे, ममाणे आदींना धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

*