मार्च एण्डमुळे बँका रात्री 8 पर्यंत सुरू

0

नाशिक : महिना अखेरीस म्हणजेच 31 मार्च रोजी सर्व शासकीय व्यवहार हाताळणार्‍या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी हे लक्षात घेऊन 31 मार्च रोजी स्टेट बँकेसह शासकीय व्यवहार हाताळणार्‍या सर्व बँका रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

31 मार्च या दिवशी शासनाचे व्यवहार स्टेट बँकेच्या माध्यमातून केले जात असल्यामुळे प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार आणि जिल्हा तालुका उपकोषागार कार्यालयाकडून कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कोषागार शाखा, नाशिकरोड, देवळाली कॅम्प शाखा, सुरगाणा येथील देना बँक शाखा, व शासकीय व्यवहार हाताळणार्‍या अन्य बँक शाखा तसेच जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या स्टेट बँकेच्या शाखा रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार शासकीय बँकांच्या शाखाही सरकारी व्यवसायासाठी 29, 30 आणि 31 मार्च अशा तिन्ही दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राप्तीकर, विक्रीकर, व्यवसायकर, मालमत्ताकर अशा विविध प्रकारच्या करांचा भरणा बँकेत स्वीकारला जातो. अशा करदात्यांच्या सोयीसाठी बँकेचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार असून, विशेष क्लिअरिंगद्वारे हा भरणा त्याच दिवशी सरकारी तिजोरीत जमाही केला जाणार आहे. या तिन्ही दिवशी बँकांची क्लिअरिंग हाऊसेस रात्री दहापर्यंत सुरू राहणार असून, कर्मचार्‍यांनाही रात्री उशिरापर्यंत थांबून हे व्यवहार पूर्ण करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*