माय गणेश : सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा चौपाटी कारंजाचा राजा

0

चौपाटी कारंजा मित्र मंडळ हे नगर शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक. गणेशोत्सवासोबतच या मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सामाजिक प्रश्‍नांवर देखावा उभारण्यासाठी या मंडळाचा भर असतो. तब्बल 20पेक्षा जास्त बक्षिसे या मंडळाने मिळवली आहेत. विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. रिक्षाचालकांचा त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. हातावर पोट भरून उत्सव साजरा करणार्‍यांचे हे मंडळ आहे. त्यांनी राजकारण वास लागू दिला नाही. हेच त्यांच्या एकीचे बळ असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

शहरातील चितळे रोड परिसरात सन 1947 रोजी चौपाटी कारंजा परिसरातील नागरिक एकत्र येऊन चौपाटी कारंजा मित्र मंडळाची स्थापना केली आहे. 70 वर्षाची परंपरा हे मंडळ जोपासत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे यांनी सांगितले. चौपाटी कारंजा परिसरातील युवक, रिक्षा चालक एकत्र येत बाप्पांचा उत्सव मोठ्या हिरीरीने पार पाडतात.
या मंडळात पूर्वी कै. माजी नगरसेवक रेवूजी राऊत, कै.सदाभाऊ चत्तर, कै.बाबासाहेब रोहकले, कै. देविदास तावरे होते. या लोकांनी मंडळाची पायाभरणी केली होती. त्यांनी सुरू केलेली परंपरा आम्ही त्यांच्या पध्दतीने चालू ठेवली आहे.
सध्या मंडळात 50 पेक्षा जास्त अजीव सभासद आहेत. या मंडळात परिसरातील नागरिक, रिक्षा चालकांचा मोठा सहभाग असतो. मंडळ चालवित असतांना दरवर्षी एक ते दीड लाख रूपये खर्च येते. हा खर्च आमच्यासाठी खूप मोठा आहे. कारण आम्ही सर्व युवक हे काम करून घर चालवितो. मात्र, बाप्पा आमच्या पाठीमागे नेहमी उभा राहतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही वर्गणी परिसरातील नागरिकांकडून मागतो. समोरचा व्यक्ती त्यांच्या परिस्थितीनुसार जेवढी वर्गणी देईल. त्यांच्या आम्ही आंनदाने स्वीकार करतो. पण कोणालाही बळजबरी करीत नाही. जर गणेश उत्सावास आवश्यक रक्कम गोळा न झाल्यास आमाच्या सभासदातून वर्गणी जमा करतो.
उत्सवापूर्वी तीन महिने अगोदर नियोजन करतो. यात प्रत्येक कार्यकत्याचे मत जाणून घेतो. तो लहान असो व मोठा असो आमच्या मंडळात आम्ही प्रत्येकाला आदाराचे स्थान देतो. या मिटिंगमध्ये आरस कोणती कारायची, गणेश मूर्ती कोणती बसवायची आदीसह विविध चर्चा होतो.
गणेश उत्सावाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पध्दतीने आम्ही मिरवणूक काढतो. या मिरवणूक परिसरातील नागरिक युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. प्रत्येक दिवशी परिसरातील मान्यवराच्या हस्ते सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते.
अनेक वर्षापासून विविध सामाजिक प्रश्‍नावर देखावे नगरकरांसाठी तयार करतो. गणेशउत्सावाच्या 4 किंवा 5 दिवशी हे देखावे नगराकरांना पाहण्यासाठी खुले करतो. प्रशासनाच्या वतीने विविध स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धामध्ये आमच्या मंडळास जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला बक्षिसे मिळतात. असे आनंदाने सांगावेसे वाटते. विसर्जनाच्या दिवशी आम्ही पारंपरिक पध्दतीने गणपतीचे विसर्जन करतो.

बाप्पांचा आशीर्वाद
मंडळ चालविणे खूप कठीण काम आहे. आमच्या मंडळात सर्व कार्यकर्ते, मित्र हे सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. यात रिक्षा चालकांचा देखील मोठा सहभाग आहे. दरवर्षी मंडळ चालविताना आम्ही राजकारण विरहित मंडळ चालवितो. त्यामुळे आमचे मंडळ टिकून आहे. तसेच बाप्पांचा हात आमच्या डोक्यावर असल्याने कोणतीही कमी पडत नाही.
– अध्यक्ष, अमोल भंडारे, चौपाटी करांजा मित्र मंडळ (ट्रस्ट)

सामाजिक उपक्रम
वर्षभर मंडळाच्या वतीने, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शिव जयंती, दसरा, अनाथ मुलांना खाऊ वाटप, वारकर्‍यांना भोजन, सामाजिक संस्थेत भाऊबीज असे विविध सामजिक उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून वेळोवेळी करत असतो. ज्या प्रमाणे पूर्वी मंडळ विविध सामजिक उपक्रम, समाजसेवा करत असत त्यांच पध्दतीने सध्या हे मंडळ चालवित आहे. परिसरातील नागरिक, तसेच नगरकर यांचे मोठे सहकार्य करतात. हीच आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे, असे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.

 

 

LEAVE A REPLY

*