मामी-भाचीला मुळा कालव्यात जलसमाधी

0
तेलकुडगाव/देवगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील देवगाव येथील कोळगे वस्तीवरील धुणे धुण्यासाठी गेलेल्या मामी व उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या घरी आलेल्या भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घटना घडली.
तालुक्यात सध्याला मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. देवगाव व परिसरात मुळा उजवा कालव्याचा वेढा असल्याने व उन्हाळ्याची तीव्रता भयानक असल्याने या परिसरात पाटात पोहणार्‍या तरुणांचे प्रमाण वाढत आहे .तसेच गावाच्या लगत हा कालवा गेल्याने गावातील महिला धुणे धुण्यासाठी गर्दी करत आहेत.
काल सकाळी देवगाव येथील कोळगे वस्तीवरील अनिता संदीप कोळगे (मामी, वय 20) व भाची मयुरी पंढरीनाथ चव्हाण गंगापूर (वय 14 ) या दोघी गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान मुळा उजवा कालव्यालगतच वस्ती असल्याने धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. मामी अनिता या धुणे धूत होत्या. त्याच्या शेजारी भाची मयुरीही होती. तिचा तोल जाऊन ती पाटात हळूहळू बुडू लागल्याने मामीने तिला वाचवण्यासाठी पाटात उतरून हात दिला. मात्र दोघींना पोहता येत नसल्याने मामीने हात दिल्यावर पाण्याचा वेग जोराचा असल्याने दोघी पाण्यात वाहून जात असल्याचे जवळच खेळत असलेल्या अनिताच्या पुतण्याने बघितले. त्याने लगेच आरडाओरडा केला. त्यानंतर दहा-पंधरा
मिनिटांनी शेजारील व गावातील तरुणांनी पाण्यात बुड्या घेऊन एक ते दोन किलोमीटर पर्यंत शोधूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ही वार्ता वार्‍यासारखी परिसरात पसरल्यामुळे या परिसरात तरुणांनी गर्दी केली होती.  याठिकाणी कुकाणा पोलीस चौकीचे संतोष फलके अमोल अजबे यानी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच उपअभियंता शाखा अभियंता कालवा निरिक्षक यानी भेट दिल्या होत्या.

 मुळा उजवा कालवा भरून वाहत असल्याने वाहून गेलेल्या दोघींना शोधणे कठीण वाटू लागल्याने कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी फोनवर बोलून पाणी कमी करून अन्य  चार्‍यांना वळवल्यामुळे या पाटातील पाणी कमी होऊ लागले होते. परिसरातील तरुण शोधकार्य करत होते.

LEAVE A REPLY

*